….अन कैतरीनाला कोसळले रडू

सलमान – कैतरीना कैफचा ‘एक था टायगर’ हा सिनेमा वाजत गाजत रिलीज झाला आणि त्याने पहिल्याच दिवशी ३० कोटीचा बिजनेस करून रेकॉर्ड प्रस्थापित केले. खरेतर ही आनंदाची बाब असूनही कतरीनासाठी ती मनस्तापाची ठरली. झाले काय, या सिनेमाच्या स्क्रीनिगसाठी आलेल्या कतरीनाच्या कपाळावर सिंधूर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. कैतरीनाने लग्न केले असल्याच्या अफवाही पसरल्या .

मिडियामधील काही जणांनी कुंकू लावलेल्या कतरीनाचा फोटो इंटरनेटवरून शेअर केल्याने सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. एवढेच नव्हे तर काही मिडिया वाल्यांनी याचे विडीओ फुटेज ही दाखविले.

आपल्या लग्नाची ही बातमी ऐकून कतरिना पहिल्यांदा गोंधळून गेली. मात्र नंतर तिला अश्रू आवरेनात. सलमानच्या खांद्यावर डोके ठेवून ती रडू लागली. प्रत्यक्षात घडलेला प्रकार मात्र वेगळाच होता. एक था टायगर रिलीज होण्यापूर्वी पूजा केली होती. यावेळी पुजाऱ्याने कैतरिनाच्या माथ्यावर सिंधूर लावले होते.

त्यानंतर सलमान व निर्माते यश राजने चर्चा करून फोटो आणि विडीओ शेअर न करण्याचे आवाहन करीत इंटरनेटवरील फोटो ब्लॉक केले.