स्वातंत्र्यदिनी मणिपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोट

इंफाळ: स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनाचे कार्यक्रम सुरू असल्याची वेळ साधूनच मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. या स्फोटात चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मणिपूरची राजधानी इंफाळ येथे ध्वजवंदनाचे कार्यक्रम ठिकठीकाणी सुरू असतानाच दहशतवाद्यांनी तीन बॉम्बस्फोट घडवून आणले. चौथा स्फोट खुद्द मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या थुबळ जिल्ह्यात झाला.

या स्फोटातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.