बिग बॉसमध्ये ‘स्पेयर मी…’ या डॉयलॉगमुळे लोकप्रिय ठरलेली मॉडेल पूजा मिश्रा सध्या काहीसी अडचणीत सापडली आहे. दिग्दर्शक महेश भट्ट व बिग बॉस मधील तिची सहकारी पोर्न स्टार सनी लीयोनवर तिने आयडिया चोरल्याचा आरोप केला आहेच पण बिग बॉसमध्ये परिधान केलेल्या कपड्याचा लिलाव पूजाने केला आहे.
दिल्ली येथील एका फैशन शो मध्ये सहभागी होताना पूजा म्हणाली, ‘ बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मी एका मैगझिनला इंटरव्हू दिला होता. एका चैरटीसाठी हे कपडे लिलाव करण्याचा निर्णय मी घेतला होता. बिग बॉसमधील कपडे मी स्वतःच डिझाईन केले होते. प्रेक्षकाना माझ्या या कपड्याची स्टाइल पसंत पडली होती. त्यामुळे त्याचा लिलाव करण्याचे मी ठरविले होते. मात्र महेश भट्ट व सनी लीयोनने माझी आयडिया चोरून त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरली आहे. मी आतापर्यंत समाजाची सेवा करण्याचे काम केले असून सनीने मात्र माझी आयडिया चोरून चित्रपट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे.
महेश भट्टने आयडिया चोरली मात्र तिचे आभारदेखील मानले नसल्याने पूजा नाराज झाली आहे. महेश व सनीने या प्रकाराबद्दल तिची माफी मागावी अशी तिची इच्छा आहे.