योशिदाला कुस्तीत सुवर्ण पदक

लंडन, दि.१० – जपानच्या सराई योशिदाने गुरुवारी महिला फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५५ किग्रॅ वर्गात सतत तिसरे ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले. जपानने यापूर्वी महिला कुस्तीत इतर दोन वर्गातही सूवर्ण पदक प्राप्त केले. 

योशिदाने कॅनडाची टोनिया लिन वेरविकला कोणत्याही गुणाशिवाय पराभुत केले. टोनिया लिनने बीजिंगमध्ये कास्य व ऍथेंस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. जपानची सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक योशिदा ऑलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपमध्ये कधीही कोणताही सामना गमावला नाही. तिने बीजिंग व ऍथेंसमध्येही ५५ किग्रॅ वर्गात सुवर्ण पदक जिंकले होते. 

यापूर्वी जपानच्या महिलेने लंडन ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेचे क्रमश: ४८ व ६३ किलोग्रॅम फ्रीस्टाइल वर्गाचे सुवर्ण पदक देखील आपल्या नावे केले. ६३ किलोग्रॅम वर्गात जपानच्या काओरी इचोने अंतिम लढतीत चीनच्या जिंग रुक्सूला पराभुत केले. यासह काओरीने ऑलिम्पिकमध्ये सतत तिसर्यांदा कुस्तीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली पैलवान बनविण्याचा गौरव प्राप्त केला.