मेनटियोचा पाय तुटला तरी टीमला फायनलमध्ये पोहोचवले

लंडन, दि. १० – ऑलिम्पिकमध्ये हिंमत आणि जिद्दीसाठी जर कोणते पदक असते, तर निश्चितपणे अमेरिकेचा मेनटियो मिचेलला या पदकाचा दावेदार ठरावा. 

कारण, ४x४०० मीटर रिले शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करणार्या टीमचा सदस्य मेनटियो मिचेलने शर्यतीला सुरूवात केली. मात्र २०० मीटर पूर्ण होतात की नाही तेव्हा अचानक त्याच्या उजव्या पायाचे हाड तुटल्याची त्याला जाणीव झाली. मेनटियोला वेदना असह्य होत होत्या. त्याला खाली पडण्याचीही भीती वाटत होती. मात्र त्याने शर्यत पूर्ण करण्याचे ठरवले. आपल्या जखमेची माहिती संघ सहकार्यांना दिली नाही. 

सामन्यानंतर जेव्हा मेनटियो कँपमध्ये पोहोचला, तेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या पायाचे हाड मोडल्याचे समोर आले. माध्यमांशी बोलताना मेनटियो म्हणाला, मला खूप त्रास झाला. मी तुटक्या पायाने ४५ सेकंदात शर्यत पूर्ण केली. हा संघ रिले शर्यतीत चॅम्पियन राहिला आहे आणि या टीमने आतापर्यंत ज्या-ज्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.

परंतु शुक्रवारच्या फायनल स्पर्धेत मेनटियो सहभागी होणार आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. 

Leave a Comment