चंदीगड: हरयाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांच्या पत्नी अनुराधा बाली उर्फ फिजा यांच्या घरात सापडलेली संपत्ती त्याची मालकी सिद्ध होईपर्यंत शासकीय तिजोरीत जमा करण्याचे आदेश चंदीगडच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकार्यांनी दिले आहेत.

मागील काही कालावधीत कोणताही मोठा उत्पन्नाचा स्त्रोत फिजाकडे नसताना एवढी संपत्ती आली कुठून; या प्रश्नामुळे पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. तिच्या मृत्यूबाबतही कोणताही धागादोरा हाती लागला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
फिजाचा मृतदेह मोहाली येथील तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत मिळाला. त्यानंतर घराची झडती घेताना पोलिसांना तब्बल ९२ लाख ८६ हजार १६० रुपयांची रोकड आणि दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. अद्याप फिजा हिच्या बँकेतील लॉकर्सची झडती घेऊन झालेली नाही.
फिजाच्या घरातील सीडीज आणि लॅपटॉप याच्या तपासणीतूनही तपासाच्या दृष्टीने फारसे काही हाती लागले नसल्याचे चंदीगडचे पोलीस उपायुक्त दर्शनसिंह मान यांनी सांगितले.