ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत फिक्सिंग: बीबीसीचा दावा

लंडन: ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत फिक्सिंग झाल्याची खळबळजनक माहिती बीबीसीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे. अझरबैजानला मुष्टियुद्ध स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवून देण्यासाठी पंचाना मोठी रक्कम लाच म्हणून दिली गेल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे.

अझरबैजानने दोन सुवर्ण पदकांसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या अधिकार्यांना ९० लाख डॉलर्स एवढी रक्कम दिली. त्यांनी पंचांना अझरबैजानच्या मुष्टियोद्ध्यांना विजयी करण्यासाठी चुकीचे निर्णय देण्यास भाग पडले असा दावा बीबीसीने केला आहे.

बँटम वेट मुष्टीयुद्ध स्पर्धेत अझरबैजानच्या मागोमेद अब्दुल्लामिडोव्ह याने जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर संशयास्पद विजय मिळविल्यानंतर जपानने या निर्णायासंबंधी अपील केले होते. त्यानंतर तुर्कमेनिस्तानच्या पंचाला कोणतेही कारण न देता घरचा रस्ता दाखविण्यात आला.

भारतीय मुष्टीयोद्धे सुमीत सांगवानआणि मनोज कुमार हे देखील पंचांच्या खराब निर्णयाचे बळी ठरले आहेत.

Leave a Comment