इंदूर, दि. १० – नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भ्रष्टाचार आणि विदेशी बँकांमधील काळापैशा विरोधात बाबांचे उपोषण सुरू आहे. रामदेव बाबा यांनी सुरू केलेल्या उपोषणा विरोधात कॉंग्रेस कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा या उपोषणामागे हात असल्याचा आरोप करत त्यांनी रामदेव बाबा यांचा पुतळा जाळला.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रामदेव बाबांचा पुतळा जाळला
कॉंग्रेसशी संबंधीत असलेल्या गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या शहर कार्यालयासमोर मोर्चा काढला. त्यानंतर रामदेव बाबा यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि नंतर रामदेव यांचा पुतळाही जाळण्यात आला.
अण्णा हजारे यांचे छूपे इरादे स्पष्ट झाल्यानंतर संघ आणि भाजप आता रामदेव बाबांचा चेहरा पुढे करून केंद्र सरकारला बदनाम करू पाहाताहेत, असे कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे. बाबा रामदेव यांनीच अनेक योग शिबिरांच्या माध्यमातून प्रचंड काळा पैसा कमावला, असाही आरोप करण्यात आला.
