विद्याने केला साडीला बाय बाय

इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केल्यापासून विद्या बालन तिच्या ड्रेस सेन्स बद्दल ओळखली जाते. अर्थात साडी हे तिचे पहिले प्रेम आहे. सिनेमा, इवेंट, अॅवार्ड फंक्शन्स व बॉलीवूड पार्टीमध्ये सुद्धा विद्या साडीमध्ये दिसत असे. मात्र सध्या तिने हा लूक बदलला असून वेस्टर्न कल्चरच्या ड्रेसमध्ये ती दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

घनचक्कर या चित्रपटात ती साडी ऐवजी ती ड्रेसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका गृहिणीची असली तरी ती पंजाबी सलवार, टी-शर्ट व रबर सॅडल घालून झळकणार आहे.

विद्या म्हणाली, ‘ या चित्रपटातील माझा रोल खूपच इंटरेस्टिंग आहे. यामध्ये मी टिपिकल गृहिणी आहे. पतीने युरोपमध्ये फिरायला घेऊन जावे असे तिचे स्वप्न असते. हे स्वप्न कसे पूर्ण होईल याचाच रात्र दिवस ती विचार करीत असते.’