मेरी कोमचा उपांत्य फेरीत प्रवेश

लंडन: ऑलिम्पिकमध्ये याचवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची जगज्जेती खेळाडू मेरी कोम हिने उपांत्य फेरीत प्रवेश करून पदकाची निश्चिती केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत लढतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवित तिने ट्युनेशियाच्या मरुआ रहालीवर विजय मिळविला.

भारतीय मुष्टियुद्धप्रेमींच्या आशा मेरीच्या कामगिरीवर केंद्रित झाल्या आहेत. मेरीने आतापर्यंत ५ वेळा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

मेरीने सोमवारी सुरुवातीपसूनच आपले वर्चस्व प्रस्थपित केले. त्यामुळे मरुआबरोबर तिची लढत एकतर्फीच झाली. गुणतालिकेत १६-६ अशा मोठ्या फरकाने मेरीने विजय संपादन केला.