मोदींसमोर पटेलांच्या ‘गुजरात परिवर्तना’चे आव्हान

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज होऊन भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले जेष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी गुजरात परिवर्तन पक्ष या नवीन पक्षाची स्थापना केली आहे. आगामी निवडणुकीत मोदी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्याचा त्यांचा निश्चय आहे.

संघाच्या मुशीत घडलेले पटेल यांनी मोदी यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून रविवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याखाली राज्यातील १८२ जागांवर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पटेल यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पटेल स्वत:ला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून प्रचार करतील. भाजपाच्या अनेक आमदार आणि पदाधिकार्‍यांचा आपल्याला पाठींबा असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.

कच्छ आणि सुरत या भागात पटेल यांचा पक्ष चांगला प्रभाव दाखवू शकेल; असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

Leave a Comment