भोपाळ: टीम अण्णाच्या राजकारण प्रवेशाला आपला विरोध नाही. मात्र हा निर्णय घाईने घेतला गेला; असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
राजकारण प्रवेशाबाबत टीमअण्णाची घाई: मेधा पाटकर
कोणत्याही चळवळीचा राजकारणाशी संबध असतोच. त्यामुळे टीम अण्णाचे राजकारणात येणे अनपेक्षित नाही. मात्र त्यांनी काही काळ जाऊ दिल्यानंतर आणि देशभरातील कार्यकर्त्यांशी व्यापक चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता; अशी अपेक्षाही पाटकर यांनी व्यक्त केली.
आपल्याला आवश्यक वाटत असलेले बदल घडविण्यासाठी राजकारणात जाण्याशिवाय पर्याय नाही; अशी खात्री झाल्यानंतरच टीम अण्णाने हा निर्णय घेतला असावा; असेही त्या म्हणाल्या.
निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि सरकारी खर्चाने निवडणुका या टीम अण्णांच्या मुद्द्यांना आपला पाठींबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
