रामदेवबाबा गुन्हेगारी प्रवृत्तीचे: दिग्विजय सिंग

इंदौर: योगगुरु रामदेवबाबा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यांच्याकडून त्यांचेच कट्टर समर्थक बाळकृष्ण यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे बाळकृष्ण यांना संपूर्ण संरक्षण द्यावे; अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

बाळकृष्ण यांना रामदेवबाबांच्या व्यवहारांबाबत खडानखडा माहिती आहे. बाळकृष्ण सध्या अटकेत असून केंद्रीय अन्वेषण विभाग त्यांची चौकशी करीत आहे. रामदेवबाबा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांचे बिंग फुटू नये यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात; असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला.

बाळकृष्ण हे नेपाळचे नागरिक असून त्यांची पदवी बनावट आहे; हे आपण पूर्वीपासून सांगत आलो आहोत आणि ते आता खरे ठरले आहे; याकडे सिंग यांनी लक्ष वेधले.

देशाबाहेर असलेला काळा पैसा परत देशात आणण्याची मागणी रामदेवबाबा करतात. मात्र देशांतर्गत काळ्या पैशाबाबत ते चकार शब्द काढत नाहीत; अशी टीका करून सिंग म्हणाले की; काळ्या पैशाची गुंतवणूक प्रामुख्याने रिअल इस्टेटच्या व्यवहारात केली जाते. रामदेवबाबांनी किती जमीन किती पैशाला खरेदी केली हे देखील जाहीर करावे; असे आव्हानही त्यांनी दिले.

Leave a Comment