
मुंबई: जिस्म-२ ची दिग्दर्शिका पूजा भट्ट हिने ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

मुंबई: जिस्म-२ ची दिग्दर्शिका पूजा भट्ट हिने ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण या जिस्म-२ च्या पोस्टरला अश्लील ठरवून ती काढून टाकायला लावत आहेत; तर दुसरीकडे त्यांचेच आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीत अभिनेत्री सनी लिओन हिला सन्मानाने आमंत्रित करतात. हा दुटप्पीपणाचा कळस आहे; असे पूजाने ट्विट केले आहे. अर्थात जोपर्यंत राजकीय पक्ष तुमचा प्रसिद्धीसाठी वापर करून घेत नाहीत तोपर्यंत तुमचा ‘ब्रँड’ तयार होत नाही हेच खरे; असेही ती उपहासाने म्हणते. नैतिकतेच्या नावाखाली राजकीय पक्ष कसे वागतात ते दिसून येत आहे; अशी टीकाही तिने केली आहे.
आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सनी गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी येत असल्याचे स्पष्टीकरण आव्हाड यांनी याबाबत दिले.