
लंडन,दि.३१ – भारतीय नेमबाज गगन नारंगने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत भारताचे लंडन ऑलिंपिकमधील पदकाचे खाते उघडले. मात्र या स्पर्धेतील अभिनव बिंद्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.

लंडन,दि.३१ – भारतीय नेमबाज गगन नारंगने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत भारताचे लंडन ऑलिंपिकमधील पदकाचे खाते उघडले. मात्र या स्पर्धेतील अभिनव बिंद्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.
१० मीटर एअर रायफल प्रकारात रोमानियाच्या जॉर्ज ऍलिन मोल्डोवेन्यूने सुवर्णपदकाची कमाई केली; तर इटलीच्या निकोलो कॅम्प्रियानीने रौप्यपदक जिंकले. नारंग ’फायनल्स’मध्ये सुरुवातीपासून पहिल्या चारमध्ये होता. त्याने ७०१.१ गुणांची कमाई करत पदक जिंकले. गगनने मिळवलेले ऑलिंपिक स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. लंडन येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर रायफल स्पर्धा झाली या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करणार्या गगन नारंगने सहा राऊंडमध्ये ५९८ गुण मिळवले. गगनने तिसर्या राऊंडमध्ये ९८ गुण मिळवले. बाकीच्या सर्व राऊंडमध्ये त्याने प्रत्येकी १०० गुण मिळवत अंतीम फेरी गाठली. गगनला ५९६ गुण मिळाले आहेत.
गगन नारंगचे आतापर्यंतचे यश
गोल्ड: २००६ मेलबॉर्न, १० मीटर एअर रायफल, वैयक्तिक
गोल्ड: २००६ मेलबॉर्न, १० मीटर एअर रायफल, पेअर
गोल्ड: २००६ मेलबॉर्न, ५० मीटर रायफल, ३ पोझिशन, वैयक्तिक
गोल्ड: २००६ मेलबॉर्न, ५० मीटर रायफल, ३ पोझिशन पेअर
(राष्ट्रकुल स्पर्धा, दिल्ली.)
गोल्ड: २०१० दिल्ली, १० मीटर एअर रायफल, वैयक्तिक
गोल्ड: २०१० दिल्ली, १० मीटर एअर रायफल, पेअर
गोल्ड: २०१० दिल्ली, ५० मीटर एअर रायफल, ३ पोझिशन, वैयक्तिक
गोल्ड: २०१० दिल्ली, ५० मीअर रायफल, ३ पोझिशन, पेअर
गोल्ड: २००३ मध्ये एशियन गेम्स
सिल्वर मेडल: २००८ मध्ये आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल