दरवाजा उघडा सॅमसंग एस थ्री मोबाईल ने

लंडन ऑलिंपिक्स गेम्सची सुरवात दणक्यात झाली आहे. लंडन नगरी ऑलिंपिकमय झाली असतानाच सॅमसंग या कोरियन स्मार्टफोन उत्पादक कंपनीने लंडनच्या स्ट्रेटफोर्ड हॉलिडे इन हॉटेलशी आगळावेगळा करार केला आहे. या हॉटेलमध्ये व्हीआयपी खोलीचे बुकींग करणार्‍या ग्राहकाला सॅमसंगतर्फे हॉलीडे  इन कस्टमाइस्ड अॅप एस थ्री स्मार्टफोनवर इन्स्टॉल करूनच दिले जाणार आहे.

याचे वैशिष्ठ असे की या अॅपमुळे रूम चेकींग-चेक आऊट, कुलुप काढणे- घालणे, टीव्ही रिमोट, रूम सर्विस या व अशा अनेक सुविधा ग्राहकाला स्मार्टफोनवरच उपलब्ध होऊ शकणार आहेत. इतकेच नव्हे तर ऑलिंपिकमधील वेगवेगळ्या स्पर्धांचे निकाल, त्यांचे वेळापत्रक व अन्य हवी ती माहिती याच फोनवरून मिळू शकणार आहे.

मोबाईल कम्युनिकेशन संदर्भात सॅमसंग जगभरातील  ऑलिंपिक स्पर्धांसाठीचे अधिकृत पार्टनर आहेत. एसथ्री हा ऑलिंपिकसाठीचा अधिकृत स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनने १० दशलक्ष विक्रीचा आकडा यापूर्वीच पार केला असून ऑलिंपिक स्पर्धांदरम्यान ही विक्री अनेक पटींने वाढेल असा अंदाज बाजारतज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment