कोरियन जायंट स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी एसथ्री स्मार्टफोन विक्रीचा १० दशलक्षांचा आकडा अल्पावधीत पार केला आहे. भारतात कंपनीने त्यांच्या गॅलॅक्सी एसथ्रीचे ३२ जीबीचे व्हर्जन बाजारात आणले असून त्याची किंमत ४१,५०० रूपये ठेवण्यात आली आहे.
सॅमसंगने यापूर्वी भारतात एसथ्रीचे १६ जीबीचे व्हर्जन ३१ मे रोजीच आणले होते. त्याची किंमत तेव्हा ४३,१८० रूपये ठेवली गेली होती. मात्र आता ३२ जीबीचे व्हर्जन त्यापेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध करून दिले आहे. नवीन व्हर्जन आणताना पूर्वीच्या १६ जीबी व्हर्जनची किंमतही कमी करून हा फोन आता ३८,४०० रूपयांतच ग्राहकांना मिळू शकणार आहे असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. हे दोन्ही फोन सॅमसंग इंडियाच्या ई – स्टोअर्समध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.