कोलंबो, दि. २९ – टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली. त्याने आपल्या कारकीर्दीतील ११वे शतक त्याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा यॉर्कर किंग मलिंगाने त्रिफळा उडवला. धोनीने ३१ धावा केल्या. गौतम गंभीर आणि सुरेश रैना फलंदाजी पिचवर आहेत. अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज आणि जीवन मेंडीस यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रीलंकेने अखेरच्या षटकांमध्ये अधिकाधिक धावा काढल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने भारताला धावांचे २८७ आव्हान दिले. मॅथ्यूजने तडाखेबाज अर्धशतक ठोकले. त्याला मेंडीसने अप्रतिम साथ दिली. मॅथ्यूजने ५७ चेंडुंमध्ये नाबाद ७१ तर मेंडीसने ४० चेंडुंमध्ये नाबाद ४५ धावा काढल्या. अखेरच्या षटकांमध्ये दोघांनी तुफान फटकेबाजी करुन टीम इंडियाच्या गोलंदाजांना जेरीस आणले. श्रीलंकेकडून परेराने १, हेराथने १ तर मलिंगाने २ विकेटस घेतल्या.
त्यापूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कमाल अवघ्या २० धावांतच लंकेच्या महत्त्वाच्या तीन फलंदाजांनी माघारी धाडण्यात यश आले मिळवले. पण नंतर संगकारा आणि जयवर्धनेच्या जोडीने १२१ धावांची भागीदारी रचत लंकेचा डाव सावरला.
जयवर्धनेने ६५ आणि संगकाराने ७३ धावांची खेळी केली. ही जोडी फोडल्यानंतर मॅथ्यूज आणि मेडिंसची जोडी लंकेच्या मदतीला धावून आली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी रचली. त्यात मॅथ्यूजच्या ७१ तर मेडिंसच्या ४५ धावांचा समावेश आहे.
अष्टपैलू एँजेलो मॅथ्यूज आणि जीवन मेंडीस यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रीलंकेने अखेरच्या षटकांमध्ये खोर्याने धावा काढल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने भारताला धावांचे २८७ आव्हान दिले. मॅथ्यूजने तडाखेबाज अर्धशतक ठोकले. त्याला मेंडीसने अप्रतिम साथ दिली. मॅथ्यूजने ५७ चेंडुंमध्ये नाबाद ७१ तर मेंडीसने ४० चेंडुंमध्ये नाबाद ४५ धावा काढल्या. अखेरच्या षटकांमध्ये दोघांनी तुफान फटकेबाजी करुन टीम इंडियाच्या गोलंदाजांना जेरीस आणले.
श्रीलंकेचा डाव सुरुवातीलाच अडचणीत आला होता. परंतु, कुमार संगकारा आणि कर्णधार माहेला जयवर्धनेने डाव सावरला. त्यानंतर ही जोडी तंबूत परतली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जयवर्धेने बाद झाला. त्याला राहुल शर्माने पायचीत केले. त्यानंतर अशोक डिंडाने संगकाराला ७३ धावांवर बाद केले. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. अवघ्या २० धावांमध्ये श्रीलंकेचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर दोघांनी अर्धशतकी भागीदारी करुन डाव सावरला. तसेच धावगतीही वाढविली. दोघांनीही दमदार अर्धशतके ठोकली. जयवर्धेनेने ४ चौकारांसह तर संगकाराने ३ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
दिनेश चंदीमलला इरफान पठाणने भोपळाही न फोडता तंबूत पाठविले. तर झहीर खानने सलामीवीरांना बाद केले. झहीरने श्रीलंकेला लागोपाठ दुसरा धक्का दिला. उपुल थरंगालाही त्याने बाद केले. कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या हाती यष्टीमागे झेल देऊन थरंगा बाद झाला. त्याने ८ धावा काढल्या. तिलकरत्ने दिलशानचा त्रिफळा उडवून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. फ्रंट फुटवर दिलशान डिफेंसिव्ह शॉट खेळला आणि एक चोरटी धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. परंतु, चेंडुकडे त्याचे लक्ष नव्हते. चेंडु हळुवारपणे स्टंपला लागला आणि बेल्स खाली पडल्या. दिलशानने ४ धावा काढल्या.
उमेश यादवच्या जागेवर संघात घेतलेला अशोक डिंडाही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने १० षटकांमध्ये तब्बल ७६ धावा केल्या.