विंडहॉक: अंतराळात घडणारया महत्वपूर्ण घटनांचे दर्शन घडविणारी ‘शेरेनकोव’ ही जगातील सर्वात मोठी दुर्बीण नामिबिया येथून कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रचंड उर्जा असणाऱ्या गेमा किरणांद्वारे ब्रम्हांडातील घडामोडी ती प्रदर्शित करू शकणार आहे.
ब्रह्मांडातील घडामोडी मानवी नजरेच्या टप्प्यात
लॉन टेनिसच्या दोन मैदानाएवढा या दुर्बिणीचा आकार आहे. या अजस्त्र दुर्बिणीचे वजन ६०० टन असून त्यावर २८ मीटर लांबीचे भिंग बसविण्यात आले आहे.
