संगकाराच्या बोटाला दुखापत झाल्याने सामने खेळू शकणार नाही

कोलंबो, दि. २८ – कोलंबो येथील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याच्या गोलदांजीवर खेळताना संगकार याच्या बोटांना चेंडूचा मार लागला. बोटाला दुखापत झाली असतानाच संगकाराने श्रीलंकेचा डाव सावरला. त्याने ७३ धावा काढल्या.

संगकाराच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुध्द सुरु असलेली एकदिवसीय मालिका तो खेळू शकणार नाही. त्याला बरे होण्यास आणखी चार-सहा आठवडे लागतील, असे संघाच्या फिजीओचे म्हणणे आहे. त्यामुळे तो भारताविरुध्दचे दोन एकदिवसीय सामने आणि एकमेव टी-२० सामना खेळू शकणार नाही.