इस्लामाबाद दि.२८- पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाक भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. मनमोहनसिंग यांच्या पाक भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारणेस गती मिळेल असे झरदारी यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे झरदारी यांनी मनमोहनसिंग यांच्यासाठी पत्र पाठविले असून त्यात ते लिहितात की पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाक भेटीचे आमंत्रण देण्यास आपल्याला अतिशय आनंद होतो आहे. नोव्हेंबर २८ ला येत असलेल्या गुरूनानक जयंतीनिमित्त मनमोहनसिंग पाक भेटीवर येतील तर अधिकच आनंद होईल. पाकिस्तानी नागरिक त्यांच्या या भेटीचे नक्कीच स्वागत करतील कारण त्यामुळे दोन्ही देशांतील आंतरधर्मिय संबंध अधिक बळकट होऊ शकतील. या भेटीत मनमोहनसिंग यांना त्यांच्या पंजाब प्रांतातील मूळ गांव गाह येथेही भेट देता येईल. सिंग यांची भेट म्हणजे दोन्ही देशातील परस्पर संबंध अधिक मजबूत होण्यासाठी मिळालेली संधी अशीच आमची भावना आहे.
झरदारी यांनी त्यांच्या एप्रिलमधील अजमेर दर्गा भेटीबाबतही समाधान व्यक्त केले असून दर्गा दर्शनानंतर दिल्लीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबरोबर झालेली बैठक एक्सलंट होती असेही पत्रात नमूद केले आहे. तसेच सिग यांनी पाक भेटीचे आमंत्रण मागेच स्वीकारले असल्याची आठवणही करून दिली आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मात्र पाक भेटीतून कांही ठोस निष्पन्न होणार असेल तरच आपल्याला पाक भेटीवर यायला आवडेल असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.