आयपीएल खेळणार नाहीत विंडीजचे खेळाडू

या पुढील आयपीएल स्पर्धेत वेस्टइंडीजच्या तीन खेळाडूच्या खेळण्यावरून प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आयपीएल सामने खेळू नये असा फतवा विंडीजचे क्रीडा मंत्र्यांनी काढला आहे. त्यामुळे आता वेस्टइंडीजच्या किरोन पोलार्ड, डेवेन ब्रेवो व सुनील नारायण या तिघाना ही आयपीएल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. हे तीन महत्वाचे खेळाडू सहभागी होणार नसल्याने त्यांचे संघ चिंतेत आहेत.

वेस्टइंडीज संघाचा धडकेबाज फलंदाज व मध्यमगती गोलंदाज असलेला किरोन पोलार्ड हा मुंबई इंडीयन्सचा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या जोरावरच मागील स्पर्धेत मुंबई इंडियन्सने अंतिम सामान्यापर्यंत मजल मारली होती. चेन्नई सुपर किंग्जचा डेवेन ब्रेवो हा हा कणा आहे. तर फिरकीपटू असलेला सुनील नारायण यांने यावर्षीच्या विजेत्या कोलकत्ता नाईट रायडर संघाकडून नशीब आजमावले होते. त्याची यावर्षीचा मॅन ऑफ द सेरीज म्हणून निवड करण्यात आली होती.

क्रीडा मंत्री रोबर्टसने या तीन खेळाडूनी आयपीएल स्पर्धेऐवजी त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून खेळवा असा प्रस्ताव पाठविला आहे. त्याबदल्यात त्यांना तेवढेच मानधन वेस्टइंडीज संघाकडून देण्यात येणार असल्याने त्यांचे कसलेच नुकसान होणार नाही. सरकारकडून जरी या तीन खेळाडूना प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी या तीन खेळाडूंनी अदयाप पर्यंत होकार दर्शविला नसल्याचे समजते. या तिघांनी येत्या काळात राष्ट्रीय संघाकडून खेळावे यासाठी त्यांचे मन परिवर्तन केले जात आहे. त्यांनी जर पुढील काळात राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला तर हा काही आयपीएल संघासाठी मात्र धक्का असणार आहे.