मुंबई: कर्ज पुरवठा आणि सेवा शुल्काच्या प्रमाणात वृद्धी करण्यात यश मिळवून भारतातील खाजगी क्षेत्रात सर्वात मोठ्या आयसीआयसीआय बेंकेने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत अपेक्षेहून अधिक नफा मिळविला आहे.

मुंबई: कर्ज पुरवठा आणि सेवा शुल्काच्या प्रमाणात वृद्धी करण्यात यश मिळवून भारतातील खाजगी क्षेत्रात सर्वात मोठ्या आयसीआयसीआय बेंकेने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत अपेक्षेहून अधिक नफा मिळविला आहे.
बेंकेने या तिमाहीत निव्वळ नफ्यामध्ये तब्बल ३६. ३ टक्के वाढ केली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बेंकेने ४८३ कोटी रुपये अधिक; म्हणजेच १८१५ कोटी रुपये एवढा नफा मिळविला आहे. अनुत्पादक कर्जाचे प्रमाणही ०.७१ टक्क्यापर्यंत खाली आणण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे.
आयसीआयसीआयने आपल्या इतर स्पर्धक बेन्काच्या तुलनेत नफ्याच्या वाढीत मोठी मजल मारली असली तरी थकीत कर्जांच्या प्रमाणातही उल्लेखनीय वाढ झाली असून त्यासाठी बेंकेला ४६६ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. बाजारपेठेतील मंदीचा बेंकेच्या व्यवसायावर या माध्यमातून परिणाम झाल्याचे दिसत असून हीच गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.