छोट्या पडद्यावर पॉप्युलर ठरलेला रियालिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या साहव्या भागाला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात होणार आहे. बॉलीवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चनच पुन्हा होस्ट म्हणून काम पाहणार आहे. बिग बी आजारी असल्याकारणाने या शोचे होस्ट म्हणून काम पाहणार नाहीत अशी चर्चा ऐकावयास मिळत होती. मात्र तसे काहीच नसून बिग बी अमिताभ बच्चनच या शोचे होस्ट म्हणून काम पाहणार आहेत.
याबाबत केबीसीच्या सूत्राने दिलेलेल्या माहिती नुसार या सहाव्या भागाची थीम ही सामान्य ज्ञान हीच असून प्रसारणाची वेळ अजून ठरली नाही मात्र प्राइम टाइम मध्ये हा शोचे प्रसारण केले जाणार आहे. हा शो गेल्या पाच वर्षापासून सर्व सामन्य प्रेक्षक वर्गात चांगलाच लोकप्रिय झाला असून शो पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कौन बनेगा करोडपतीचा पाहिला शो हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित केला जाणार आहे. त्यासोबत होस्ट म्हणून अमिताभ बच्चन काम पाहणार असल्याची माहिती ही सूत्राने दिली. बिग बी या शो चे होस्ट म्हणून काम करीत असल्यानेच या शोला मोठा रिस्पॉन्स भेटत आहे.