पारंगत तांत्रिकता व नविनतम सेदान बीएमडब्लू ३ सिरीजचा आज भारतामध्ये शुभारंभ झाला. जगातील सगळयात यशस्वी प्रिमियम कारच्या सहाव्या आवृत्त्त्तीचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरच्या हस्ते एका शानदार उद्धाटन सोहळयामध्ये अनावरण झाले.

पूर्णपणे नविन असलेली बीएमडब्लू ३ सिरीज हि बीएमडब्लू प्लांट चेन्न्नई येथे बनवली जाते आणि ती जुलै २०१२ पासून भारतभरातील सर्व बीएमडब्लू डिलरकडे उपलब्ध होईल.
नवीन सिरीजमधील गाड्या घेणार्या पहिल्या १०० ग्राहकांना सचिनच्या हस्ते गाडीच्या किल्ल्या देण्यात येणार आहेत. सचिनच्या शंभर शतकांचे सिंबॉल म्हणून ही योजना आखली गेली आहे. कंपनीतील वरीष्ठ अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार बीएमडब्ल्यूसारख्या आलिशान आणि महागड्या गाड्यांसाठी सचिनची निवड अगदी योग्य आहे. कारण त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. यापूर्वी फेरारी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणूनही सचिनची निवड केली गेली होती. सचिनकडे स्वतःच्या अनेक महागड्या गाड्या आहेत. बीएमडब्ल्यू ई-६०, एम ५- एक्स-५ अशा गाड्या तो वापरतो. त्याची पत्नी अंजली इ-९० -३ सिरीजमधली गाडी वापरते असेही समजते