जनलोकपालसाठी अण्णाही उपोषण करणार

नवी दिल्ली: जनलोकपाल विधेयकासाठी टीम अण्णा बुधवारपासून जंतर मंतरवर करणार असलेल्या उपोषण आंदोलनात स्वत: अण्णाही सहभागी होणार आहेत.जन लोकपालाच्या मुद्द्यावरून देशभर रान पेटवूनही सरकार दाद देत नसल्याने टीम अण्णाने पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा या आंदोलनात प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणाने प्रत्यक्ष उपोषण न करता केवळ आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि टीम अण्णामधील अरविन्द केजरीवाल यांच्यासह जेष्ठ सदस्य उपोषण करतील असे नियोजन होते.प्रत्यक्षात आंदोलनाच्या आदल्या दिवशी अण्णा स्वत: उपोषण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या डोकेदुखीत मात्र त्याने भर पडणार आहे