आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत एमआयटी करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे: एशियन ब्रॉडकास्टिंग रिजन यांच्यावतीने हॉंगकॉंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन स्पर्धेत येथील माईर्स एमआयटीचा संघ भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धा दि. १७ ते २१ ओगस्ट दरम्यान होणार असून या स्पर्धेत चीन, जपान, इंडोनेशिया, इजिप्त यासह २० देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

हॉंगकॉंगचा लोकप्रिय सण पेंगोन दाई गाट हा यावर्षीच्या स्पर्धेचा विषय असून प्रत्येक संघाने एक मानव संचालित आणि २ स्वयंचलित यंत्रमानव या स्पर्धेत सादर करावयाचे आहेत. सुमारे एक वर्षापासून तयारी करून एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले यंत्रमानव या स्पर्धेत भारताला यश मिळवून देटेल; असा विश्वास संस्थेचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, प्रा. सविता कुलकर्णी, प्रा. साकेत येवलेकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी भैरव शहा यांनी व्यक्त केला.