अगाथा संगमा यांचा राजीनामा?

नवी दिल्ली: केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री आणि राष्ट्रापारी निवडणुकीतील पराभूत उमेदवार पी.ए.संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा यांनी मंत्रीपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मात्र हा राजीनामा पक्षाध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वीकारल्याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस युपीए बरोबर असूनही पी.ए.संगमा यांनी एनडीए पाठींब्यावर ही निवडणूक लढविली. या निवडणुकीत अगाथा यांनी संगमा यांचा प्रचार केल्याच्या तक्रारी ओदिशा आणि छत्तीसगड येथील पक्ष कार्यालयाकडून आल्याने पक्षाच्या बैठकीपूर्वी अगाथा यांनी पवार यांना भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.