पुणे: वकिलाच्या नावाने विविध मिळकतींचे सर्च रिपोर्ट काढून देणाऱ्या बोगस वकिलाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हा बोगस वकील मुलाचा हरयाणाचं रहिवासी असून तेथे त्याच्यावर खुनासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अमितकुमार दावर (वय ३४) असे या भामात्याचे नाव असून त्याने एड. सचिन इंगुले (वय ३८) यांच्या कडून दोन मिळकतींचा सर्च रिपोर्ट काढून घेतला. त्यानंतर एड. इंगुले यांचे लेटर हेड, बनावट सही आणि शिक्के वापरून त्याने सर्च रिपोर्ट मोलावून देण्याचा धंदाच सुरू केला.
बोगस वकील गजाआड
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय वगळता इतर सर्व ठिकाणी त्याची बोगस वकिली सुरू होती. बोगस सर्च रिपोर्ट देऊन दावर याने आयसीआयसीआय, एचडीएफसी, स्टेट बेंक ऑफ इंडिया अशानेक बेन्कांची त्याने फसवणूक केली आहे. दावर हा एक वर्षात पर्दाफाश झालेला सातवा बोगस वकील आहे. या बोगस वकिलांना आळा घालण्यासाठी दर पाच वर्षांनी वकिलीच्या सनदेचे नूतनीकरण आवश्यक असल्याचे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य एड. हर्षद निंबाळकर यांनी सांगितले
