केप्टन लक्ष्मी सेहगल यांचे निधन

कानपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत महिलांच्या झाशी राणी पथकाचे नेतृत्व केलेल्या केप्टन लक्ष्मी सेहगल यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या.

हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दि. १९ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवार पासून प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात केप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली. शासनाने सन १९९८ मधे पद्म विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

केप्टन सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या राज्यसभेच्या सदस्याही होत्या. बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यात त्यांनी महत्वाचा सहभाग घेतला.