आज राष्ट्रपती निवडणुकची मतमोजणी

नवी दिल्ली, दि. २२ –  संपुआचे उमेदवार प्रणव मुखर्जी भारताचे १४वे राष्ट्रपती निवडून येण्याची पूर्ण शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान झाले होते आणि मतमोजणी होईल. कॉंग्रेसचे नेतृत्व असणार्‍या संपुआचा दावा आहे की, भाजपा समर्थित पी.ए.संगमाशी सरळ सामना करीत असलेले मुखर्जी यांना ७० टक्के मत मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सदन व विधानसभेचे सदस्य समाविष्ट असतात. यात संसदेच्या मनोनीत सदस्यांना मत टाकण्याचा हक्क नाही. मतमोजणी येथे संसद भवनात अकरा वाजता सुरू होईल आणि दुपारनंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे. सर्व राज्यांतून मतमोजणीसाठी मतपेट्या येथे आणण्यात आल्या आहे.

मुखर्जी यांना तृणमूल कॉंग्रेसहित संपुआच्या सर्व घटकाचे समर्थन प्राप्त आहे. यावेळी राष्ट्रपती निवडणुकीत फक्त ७२ टक्के मतदान झाले जे अपेक्षेने कमी आहे. निवडणुक मंडळाचे एकुण मत मूल्य १०,९८,८८२ आहे. ज्यापैकी सुमारे आठ लाख मत पडले. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, यातील मुखर्जी यांना ५-६ लाख मत मिळू शकतात. संगमा यांना भाजपा व अकाली दलाच्या व्यतिरिक्त बीजद तसेच अण्णाद्रमुकचे समर्थन मिळालेले आहे. भारताचे सर्वोच्च न्यायाधीश २५ जुलैला नवीन राष्ट्रपती पदाची शपथ देतील.