नवी दिल्ली दि२१ – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्राप्त झालेल्या प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रपती पदावरील कार्यकाल लवकरच संपणार असून दि२३ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राष्ट्रपतींना निरोप देणार आहेत.

संसदेच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, मंत्रिमंडळातील सदस्य आणि विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी संसद सदस्यांची सही असलेला स्क्रोल आणि सन्मानचिन्ह राष्ट्रपतींना दिले जाणार आहे.