सर्कशीतील वाघाने केली प्रेक्षकांवर शू !

मॉस्को – कजाकिस्तानमध्ये मास्को सर्कसच्या एक शोदरम्यान एक विचित्र घटना घडली. सर्कशीतील एका वाघाने व्हीआयपी आसनावर बसलेल्या प्रेक्षकांवर चक्क शू केली! नोवोस्ती-कजाकिस्तानच्या वृत्तानुसार केशा नामक नर वाघाला एक कसरत दाखविण्याचा आदेश रिंगमास्टरने दिला. मात्र त्याने कसरत दाखविण्याऐवजी आपली टांग उचलून व्हीआयपी आसनावर बसलेल्या लोकांवर शू केली. अनेक मुले आणि प्रौढांच्या अंगावर हे मूत्रविसर्जन झाले. त्यामुळे तेथील परिस्थिती खूप हास्यास्पद बनली आणि शो थांबवावा लागला. अर्थात, प्रेक्षकांनी स्वतःला रूमालाने स्वच्छ केल्यानंतर शो पुन्हा सुरू झाला. सर्कस मालकाविरूद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नाही.