भोपाळ: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर बोलताना पंतप्रधानांबाबत अनुचित उद्गार काढल्यामुळे संतापलेल्या जमावाने योगगुरू रामदेव बाबा यांच्या गाडीवर दगडफेक केली. हा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप रामदेव बाबांनी केला आहे.

सागर इन्स्तित्यूत ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगताना रामदेव बाबा म्हणाले की; ‘प्रत्येकाने रोज योगासने केली पाहिजेत. योगासने केली नाहीत तर पंतप्रधानांसारखे घाबरत बनाल; अशी मल्लीनाथीही त्यांनी केली. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर त्यांची राजकीय पात घसरेल; असा सल्लाही त्यांनी दिला.