सैफ आणि करीना १६ ऑक्टोबरला विवाहबद्ध होणार

भोपाळ: आपल्या लग्नाची तारीख निश्चित झाली नसल्याचे छोटे नबाब सैफ अली खानचे म्हणणे असले तरीही त्याची आई शर्मिला टागोर यांनी सैफ आणि करीनाचा विवाह १६ ऑक्टोबरला होणार असल्याचे एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. विवाहाचे ठिकाण मुंबई असणार की पतौडी पेलेस हे मात्र अजून निश्चित झालेले नाही.
     हा विवाह सोहळा मुंबईतच व्हावा अशी करीनाचे वडील रणधीर कपूर यांची इच्छा आहे. सैफ आणि करीना १६ तारखेला नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार असले तरीही पारंपारिक पद्धतीने निकाह कधी होणार हे ठरलेले नाही. या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून करीना विवाह समारंभात आपण लग्नात आपल्या लग्नात परिधान केलेला पोशाख आणि दागिने घालणार आहे; असेही शर्मिला यांनी सांगितले.

Leave a Comment