अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस. यावर्षी प्रियंका तिचा वाढदिवस स्पेनमध्ये साजरा करत असून गेल्या काही दिवसापासून ती मित्रासोबत सुट्टीसाठी स्पेनमध्ये गेली आहे. त्यासोबतच ती याठिकाणी म्युझिक व्हीडीओचे शुटींग करणार आहे. त्यासाठी तिने सोबत तिची संपूर्ण टीम नेली आहे.
प्रियंकाने बर्फी, कृष २ आणि तेरी मेरी कहाणी चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. त्यामुळेच तिने थोडासा आराम करण्यासाठी सुट्टी काढली आहे. सुट्टीसाठी जरी तिने स्पेनची निवड केली असली तरी ती याठिकाणी म्युझिक व्हीडीओच्या शुटींगच्या कामात जास्त व्यस्त आहे. त्यामुळे आता तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी यामधून वेळ मिळतो का नाही हे अजून तरी समजले नाही.
प्रियंकाने सध्या गायिका म्हणून करियर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तिने गाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर प्रियंकाने लगेचच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच तिने आता पुन्हा म्युझिकच्या करियरवर लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते.