
जळगाव, दि. १८ – स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांनी राज्यभर खळबळ माजली असली, तरीही या अर्भकांचा जन्मण्यापूर्वीच गळा घोटण्याच्या प्रकारांना आळा बसल्याचे दिसून येत नाही. शहरातील दमाणी रुग्णालयात शौचालयाच्या चेंबरमध्ये मंगळवारी एक स्त्री अर्भक सापडले. गर्भपात करून ते अर्भक शौचालयात टाकल्याचा पोलिसांचा कयास आहे.
