सीरियाचे राष्ट्रपती रासायनिक शस्त्रांचा प्रयोग करणार?

लंडन, दि. १८ – सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद आपल्या विरोधकांच्या विरोधात रासायनिक शस्त्रांचा प्रयोग करण्याची शक्यता आहे. असद सरकारची सर्वप्रथम साथ सोडणारे माजी राजदूत नवाफ फरेस यांनी सोमवारी कतरहून ही माहिती दिली. ही रासायनिक शस्त्रे तैनात करण्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

फरेस यांनी ठामपणे सांगितले की, असद शासनाचे आता फार थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. असद सत्तेत राहण्यासाठी सीरियातील सर्व लोकांची हत्या करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

फरेस म्हणाले, असद शासनाला लोकांनी कठीण परिस्थितीत टाकले तर ते रासायनिक शस्त्रांचा प्रयोग करूर शकतात. `इराकमधील सीरियाचे माजी राजदूत फरेस यांनी पुष्टी न झालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले की, होम्समध्ये रासायनिक शस्त्रांचा प्रयोग करण्यात आला आहे.’

सीरियाकडे रासायनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. त्याचे शेजारी देश यामुळे चिंतित आहेत की असद सरकारचे पतन झाल्यानंतर त्यांचे काय होईल. ११ जुलै रोजी सरकारशी नाते तोडण्याची घोषणा करणारे फरेस यांना शासनाचा एक कट्टरपंथी व्यक्ती मानले जात होते. त्यांनी सरकारशी नाते तोडण्याकडे मानवाधिकार कार्यकर्ते संशयाने पहात आहेत.

सीरिया मुद्द्यावर होणार मतदान
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सीरियाशी संबंधित बातचीत भंग पावली आहे. आता सुरक्षा परिषदेत सीरियाशी संबंधीत प्रस्तावावर बुधवारी मतदान होईल. पश्‍चिम देशांच्या या प्रस्तावात इशारा होता की, सीरिया सरकारने शहरात मोठ्या शस्त्रांचा प्रयोग बंद केला नाही तर त्याच्याविरूद्ध प्रतिबंध घातले जाऊ शकतात. रशियाने या प्रस्तावाचा विरोध करण्याची घोषणा केली. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि पुर्तगाल प्रस्तावावर मतदान घेऊ इच्छितात.