एचएसबीसी बँकेची दहशतवाद्यांसह देवाणघेवाण

वॉशिंग्टन, दि. १८ –  अमेरिकन सीनेटच्या एक पॅनलने आरोप लावला की, एचएसबीसी बँकेने दहशतवादी,  मनी लॉड्रिंगशी संबंधित लोक व मादक पदार्थांचा अनाधिकृत व्यापार करणार्‍यांसह अब्ज डॉलरची देवाणघेवाण केली.

या जागतिक बँकेच्या कार्यकलापची एक वर्षापर्यंत चौकशी केल्यानंतर अमेरिकन संसदेवर सदन सीनेटची `परमानेंट सब कमेटी ऑन इन्वेस्टीगेशन’ ने सांगितले की, एचएसबीसीने सौदी अरबची अल रजही बँकेशी व्यवहार केला. याच्या मुख्य संस्थापकाला पूर्वी अलकायदाचे आर्थिक संरक्षण मिळालेले होते. एचएसबीसीवर मेक्सिको, इरान, उत्तर कोरिया, सौदी अरब, बांग्लादेश, सीरिया, क्यूबा, सूडान, म्यानमार, जपान व रशियाच्या संस्थेसह संशयित देवाणघेवाणीचे आरोप देखील लावण्यात आलेले आहे.

एचएसबीसीवर विशेष रूपाने आरोप लावण्यात आला की, त्याने सौदी अरब व बांग्लादेशच्या त्या बँकांना डॉलर व बँकिग सेवा प्रदान केली. जे दहशतवाद्यांना पैसे उपलब्ध करण्यात जुडले आहेत. सब कमेटीच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करून एचएसबीसीने सांगितले की, तो अगोदर नियामकच्या अटीचे पालन न करणे व ग्राहक मापदंडावर खरे न उतरण्यासाठी माफी मागेल. कमेटीने चौकशी संबंधित संक्षिप्त अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला.