लंडन, दि. १६ – एटीपी क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहण्याचा पीट सॅम्प्रासचा विक्रम स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररने मागे टाकला आहे. गेल्याच आठवड्यात विम्बल्डनचे जेतेपद पटकावणार्या फेडररने पुन्हा एकदा क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवले होते.

विम्बल्डनच्या जेतेपदामुळे फेडररला जून २०१० नंतर प्रथमच अव्वल स्थान मिळवता आले होते. याआधी हा विक्रम सॅम्प्रासच्या नावावर होता. फेडररने एटीपी क्रमवारीत २८७ आठवडे अव्वल स्थानावर राहण्याची विक्रम केला आहे. फेब्रुवारी २००४ मध्ये फेडररने सर्वप्रथम क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.
`ग्रास कोर्ट’ वरचा राजा असलेल्या फेडररने विम्बल्डनमध्ये ऍँडी मरेचा पराभव करत १७वे ग्रॅडस्लॅम जेतेपद पटकावले होते. पीट माझा लहानपणापासूनचा हिरो आहे. त्याचा खेळ पाहूनच मी मोठा झाल्याचे फेडररने १७व्या जेतेपदानंतर सांगितले होते. एटीपी क्रमवारीत फेडरर सध्या ११,०७५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. नोव्हाक डोकोव्हिच ११,००० हजार गुणांसह दुसर्या, तर राफेल नाडाल ८,९०५ गुणांसह तिसर्या स्थानावर आहे.