
दि.१७- मध्य काश्मीरमधील बाबा हनीफउद्दीन दर्ग्याला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हा दर्गा पूर्ण जळून गेल्याने वातावरण तणावाचे बनले आहे. बडगांव जिल्ह्यात हा दर्गा असून सुफी परंपरा असणार्या कारवान ई इस्लामी या संघटनेने या प्रकाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. या आगीची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे असे सांगण्यात आले.
