
हॉट मॉडेल पूनम पांडे आणि बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. बिपाशा बासूने नुकेतच एक वक्तव्य केले होते की, पुरूष हे हरणारे असतात. ते लूजर्स आहेत. अशी टीकाटीप्पणी बिपाशाने पुरूषांविरोधात केली आहे.
त्यानंतर पूनम पांडे मात्र चांगलीच बिथरली आणि मात्र त्यानंतर तिने बिपाशावर जो काही हल्लाबोल केला. तो अगदीच अनपेक्षित असा होता. पूनमने पुरूषांची बाजू घेत बिपाशाला चांगलेच सुनावले आहे. ‘बिपाशाला आजवर कोणी पुरूष मिळाला नसेल’. त्यामुळे बिकनी क्वीन पूनम पांडेने बिपाशालाच लूजर्स ठरविले आहे. बिपाशा आपल्या करीअरपासून असंतुष्ट आहे. पूनमने बिपाशावर अक्षरश: तोफ डागली आहे. ‘बिपाशा जर आजचे पुरूष हे लूजर्स आहेत तर तू कोणत्या म्हातार्या श्रीमंत व्यक्तीसोबत राहणार आहेस?’
