
माजी दूरसंचार मंत्री आणि स्पेक्ट्रूम वाटप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ए.राजा यांची बुधवारी अम्मलबजावणी संचालनालयाने (ईडी)प्रथमच चौकशी केली. या चौकशीत अधिकार्यांनी त्यांना विविध स्पेक्ट्रूम वाटप, वैयक्तीक कमाई आणि खर्च, स्पेक्ट्रूम वाटपात त्यांच्या मंत्रायलातील सहकार्यांची भूमिका अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले असल्याचे समजते. इडीने राजा यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टनुसार त्यांच्या पैशांशीसंबंधित सर्व कागदपत्रेही बरोबर आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
