बिग बीच्या ट्विटरवरून चोरी

बिग बी ला सध्या चोरांनी हैराण केले आहे.काही दिवसापूर्वी त्याच्या घरी चोरी झाली. ही घटना ताजी असतानाच आता त्यांच्या ट्विटर अकौंटवरही चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या प्रकारामुळे सिनीयर बच्चन हताश झाले आहेत.

बुधवारी बच्चन यांच्या ट्विटरवरील पेजचा अर्धा बॅक ग्राउंड गायब झालेला त्यांना दिसला. त्यांनी आपल्या या ट्विटर पेजवर स्वतःचे खूप फोटो लावलेले होते. मात्र अचानक अर्धे पेज रिकामे दिसत असल्याने त्यांना चोरी झाली असल्याचा संशय आला. याबाबत ट्विटरवर चोरी झाल्याचे अपडेट लिहल्यानंतर ट्विटरवर चोरी झाली असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना समजली. बिग बी ने मात्र त्यांच्या ट्विटरवर घुसखोरी करणाऱ्याबद्दल काहीच अपडेट केले नाही. त्यामुळे त्यांच्या अकौंटवर कोणी चोरी केली याचा तपशिल समजू शकला नाही.

Leave a Comment