एक था टायगरच्या प्रोमोवर पाकमध्ये बंदी

अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित एक था टायगर या चित्रपटाच्या प्रोमोवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. पाक सूत्राच्या मते या चित्रपटाच्या कथानकामुळे आयएसआयची प्रतिमा खराब होत असल्या कारणाने या चित्रपटाच्या प्रोमोवर बंदी घातली आहे.

यशराज फिल्मच्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या एक था टायगर या चित्रपटात सलमान खान भारत व पाकिस्तान मधील गुप्तहेर संघटनेचे काम कशा पद्धतीने चालते यावर प्रकाश टाकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानने गुप्तहेराची भूमिका केली आहे. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने त्यांच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची प्रतिमा जनमानसात खराब होऊ नये म्हणून यावर बंदी घातली आहे.

एक था टायगर हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून सध्या त्याचे प्रमोशनचे काम देशभरात सुरु आहे. या प्रमोशनच्या कामात व्यस्त असतानाच पाकिस्तान सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने यशराज फिल्ममध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

आपण एक था टायगर चा प्रोमो खाली बघू शकतात.