
सिडने दि.९- निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी ब्रिगेडीअर इजाझ शाह यांनी सिडने मॉर्निंग या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओसाबा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अनेक वर्षे थारा देण्यात आला होता आणि त्यासाठी माजी आयएसआय प्रमुख जनरल झईउद्दीन बट यांचाच हात होता असा दावा करण्यात आला असून ओसामाच्या या निवासाची कल्पना पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनाही होती असाही दावा करण्यात आला आहे.
