नायिकांचे रिलेशनशिप

विद्या बालन, कतरीना यांचे नावे ऐकूनच ह्रदयाची धड धड वाढण्यास सुरुवात होते. तर अनुष्का व सोनम कपूरला बघितल्यानंतर आपल्याला पण अशी एखादी जीवनसाथी मिळावी अशी मनोमन इच्छा होते. मात्र असे काही स्वप्न बघत असाल, तर सोडून द्या कारण की आघाडीच्या या सर्व नायिका कुठेना कुठे तरी रिलेशनशिपमध्ये बुक आहेत.

जरी नायिका लग्नाला विरोध दर्शवित असल्या, तरी त्या लवकर आपले मार्केट डाऊन करू इच्छित नसल्यामुळे त्या याबाबत काहीच सांगत नाहीत. दुसरे म्हणजे आपल्या बॉयफ्रेंडविषयी त्या काहीच माहिती सांगत नाहीत. त्यामुळे त्यांचा डबल फायदा होतो. एक तर त्यांच्या नावाबाबत सस्पेन्स राहतो व दुसरे म्हणजे त्यांना पब्लिसिटी मिळते.

करीना कपूर १६ ऑक्टोबर रोजी सैफ अली खान सोबत विवाह करीत आहे. तर तिकडे विद्या बालन सिद्धार्थ कपूर सोबत सर्वांना फिरताना दिसते. जरी कतरीनाचे सलमान खान सोबत रिलेशन असल्याचे म्हटले जात असले, तरी सध्या तिचे आतून मात्र रणबीर कपूरसोबत रिलेशन असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री सोनम कपूर दिग्दर्शक पुनीत मल्होत्रासोबत एंगेज आहे. तर तिकडे रणवीर सिंह स्पेनमध्ये अनुष्कासोबत फिरताना दिसतो.