सोमवारी इंटरनेट सर्व्हर पडणार बंद, मालवेअरचा ’राडा’!

गेल्या वर्षभरापासून जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संगणकामध्ये घर करून बसलेला मालवेअर येत्या सोमवारी इंटरनेट सेवेवरच घाला घालणार असून या समस्येबाबतची माहिती जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना फेसबुक आणि गुगलद्वारे देण्यात आली आहे. अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी विशेष वेबसाइट सुरू केली आहे. जे इंटरनेट वापरकर्ते तातडीने त्यांच्या संगणकाचे मालवेअर क्वीक चेक करणार नाहीत, त्यांना मात्र सोमवारी इंटरनेट सेवेला मुकावे लागणार आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी इंटरनेटच्या जाळ्यात एका खतरनाक मालवेअरने घुसखोरी केली आहे. या मालवेअरबाबत वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येऊनही आजही जगभरातील २७७००० हून अधिक संगणक या मालवेअरने इन्फेक्टेड आहे. म्हणजेच या संगणकांमध्ये हा मालवेअर घर करून बसला आहे. एप्रिलमध्ये ही संख्या ३६०००० हून अधिक होती.

ज्या इंटरनेट वापरकर्त्यांचे संगणक अजूनही या मालवेअरने इन्फेक्टेड आहेत, त्यांना सोमवारी ऑनलाइन जाता येणार नाही. त्यांना त्यांच्या इंटरनेट सेवाप्रदात्याला संगणकातील मालवेअर डिलिट करून इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करण्याची विनंती करावी लागणार आहे.

इंटरनेट सेवाप्रदात्यांनी इन्फेक्टेड सर्व्हरच्या समस्येवर तोडगा काढला तर इंटरनेट सेवा सुरू राहील मात्र हा मालवेअर इंटनेट वापरकर्त्याच्या संगणकात तसाच राहील आणि भविष्यात तो कधीही डोकेदुखी ठरू शकतो, असे एफबीआयच्या विशेष निरीक्षण पथकाचे सदस्य टॉम ग्रॉस्सो यांनी म्हटले आहे.

एफबीआयचे दोन नवीन सर्व्हर

हॅकर्सच्या या टोळीविरूद्ध पुकारलेल्या युद्धात एफबीआयने अनपेक्षितपणे सेफ्टी नेट सुरू केले आहे. एका खाजगी कंपनीकडून एफबीआयने दोन नवे कोरे सर्व्हर इन्स्टॉल करून घेतले आहेत. मालवेअरने इन्फेक्टेड सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांची इंटरनेट सेवा लगेचच बंद होऊन नये यासाठी या दोन सर्व्हरचा वापर करण्यात येणार आहे. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असून आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ९ जुलै रोजी ०४०१ जीएमटी वाजता ती बंद केली जाणार आहे.

काय आहे नेमकी समस्या?
वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय हॅकरच्या टोळीने जगभरातील ५७०,००० अधिक इन्फेक्टेड संगणकाचा ताबा घेण्यासाठी एक ऑनलाइन जाहिरात घोटाळा रन केला होता. एफबीआयने जेव्हा या टोळीचा छडा लावून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र हॅकर्सना संगणकाचा ताबा घेण्यापासून रोखण्यासाठी ते वापरत असलेले इन्फेक्टेड सर्व्हर बंद केल्याशिवाय अन्य पर्याय नाही. परिणामी सर्व बाधित इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी गमवावी लागणार आहे.

Leave a Comment