औरंगाबाद, ७ जुलै-औरंगाबादमध्ये झालेला गँगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवृत्त पोलीस अधिकार्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झाला आहे. निवृत्त डीवायएसपी एस. के. शर्मा यांचा मुलगा किशोर याने आणि त्याच्या ३ मित्रांनी बलात्कार केल्याचे माहितीतून उघड झाले आहे. किशोरवर अपहरण आणि बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी किशोर शर्माला अटक केली आहे. त्याच्यासोबत उस्मानाबादमधल्या पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करणार्या क्लार्कचा मुलगा आनंद नागरकोलसह नंदू शिरसाट आणि किरण या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
धक्कादायक बाबम्हणजे निवृत्त पोलीस अधिकार्यासमोरच बलात्कार करण्यात आला. औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. बुधवार रात्रीपासून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. छावणी परिसरातल्या ख्रिश्चन मिशनरीच्या विद्यादीप आश्रमातून दोन मुली गायब झाल्या होत्या दोन्ही मुली अल्पवयीन होत्या.
त्यापैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे उघड झाले आहे याप्रकरणी ६ जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांत ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. या मुली बुधवारी पहाटेपासून आश्रमातून गायब होत्या. पोलीस या मुलींचा शोध घेत असतांना, एक मुलगी त्यांना सापडली. मात्र, दुसर्या मुलीवर गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
धक्कादायक गोष्ट ही की या चार आरोपींना बलात्कार करण्यासाठी किशोरची आई आणि माजी पोलिस उपअधीक्षांच्या पत्नी जयश्री शर्मा यांनीच मदत केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत अनाथालयातल्या एका मुलीलाही अपहरणप्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार माजी पोलिस उपाधीक्षकांच्या घरात झाल्याचीही माहिती मिळत आहे.