चार दिवसांपासून अमेरिकेतील लाखो घरे अंधारात!

वॉशिंग्टन, ४ जुलै –  उन्हाळ्याच्या दिवसांत भारतासारख्या विकसनशील देशात विजेचे येणे-जाणे भारतीयांना सवयीचे झालेले आहे. मात्र, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात अनेक दिवस वीज गुल झाली ते नक्कीच विशेष होय.

वादळामुळे पूर्व अमेरिकेत चार दिवसांपासून सुमारे १३ लाख घरात वीज नाही. एवढेच नाही तर उन्हाच्या या मोसमात तेथे आतापर्यंत १४ लोकांचा बळीही गेला आहे. हे बळी राजधानी वॉशिंग्टन डी सी, मेरीलँड आणि व्हर्जिनियापासून ते क्यूबेक आणि ओक्लाहोमा यासारख्या भागात गेले आहेत. येथे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या कामात लागलेल्या कंपन्यांनी अनेक भागांना शुक्रवारपर्यंत विजेची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

सर्व काही ठप्प
वीज टंचाईमुळे वॉशिंग्टन डीसीजवळ बुधवारी स्वातंत्र्य दिन समारंभाशी संबंधीत अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. मेरीलँड आणि व्हर्जिनियात अनेक ठिकाणी ट्रॅफिक लाइट्स निकामी झाले आहेत. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी आलेल्या अनेक वादळांनी ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेल्या या भागात हाहाकार उडाला आणि इंडियाना ते डेलावेयरपर्यंत वीज पुरवठा ठप्प झाला.